अकोला, पुढारी वृत्तसेवा : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव जवळील बल्हाडी शेतशिवारात नीलगायने शेतकऱ्यास धडक दिली. या घटनेत शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, बल्हाडी येथील ५० वर्षीय शेतकरी शिवाजी माळवे आपल्या शेतात जात होते. शेतात वन्यप्राणी नीलगायीचा कळप अचानक धावत आला. या मधील एका नीलगायने शेतकरी माळवे यांना धडक दिली. या घटनेत गंभीर दुखापत होऊन त्यांच्या पायाला गंभीर ईजा झाली. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अकोला : दोन मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराकडून नामनिर्देशन दाखल 2024-10-30T10:55:47Z