MAHARASHTRA ASSEMBLY POLLS: श्रीरामपुरात महायुतीत मोठ्या बंडांचे संकेत!

Political News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ संघात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी उमेदवारी अर्ज भरला. तसेच महाविकास आघाडीकडून ही जागा शिंदे शिवसेनेची असतानाही महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आ. लहू कानडे, शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे व त्यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांनी अपक्ष व शिवसेनेकडून अर्ज दाखल केले आहेत.

महायुतीतील उमेदवारांची तोंडे चार दिशेला दिसून आल्याने कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याने श्रीरामपूरच्या महायुतीत मोठे बंड होताना दिसत आहे. काँग्रेसचे आ. लहू कानडे यांना काँग्रेसने तिकीट नाकारून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले आ. कानडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला व उमेदवारी निश्चित केली.

काल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या समवेत पक्षाचा एबी फॉर्म जोडत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अनेक दिवसापासून शिंदे शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळेल या आशेवर बसलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सोमवारी रात्री शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित करत पक्षाचा एबी फॉर्म बरोबर घेवून काल उमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Assembly Polls: मंत्री विखेंच्या उपस्थितीत खताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

त्या अगोदर शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांनी एक अपक्ष व दुसरा शिवसेनेच्या नावाने असे दोन अर्ज दाखल केले. काल शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी बंड पुकारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली.

काल त्यांनीही मनसेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीतील घटक पक्षांनी बंड पुकारत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत मोठ्या प्रकारचे बंड झाले. आता उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी कोण आपला उमेदवारी अर्ज माघार घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

खरंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीची जागा ही शिंदे शिवसेनेची असतानाही महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाने आ. कानडे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देऊन एबी फॉर्मही देवून राष्ट्रवादीने शिवसेनेच्या जागेवर घाला घातला. आमदार कानडे यांना राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी उमेदवारी मिळवून देत श्रीरामपूरच्या जागेवर हक्क सांगितला.

तसेच ही जागा शिंदे शिवसेनेचीच असल्यामुळे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आग्रह धरला होता आणि माजी आमदार कांबळे यांना उमेदवारी मिळवून देण्यात विखे पाटील यशस्वी ठरले. आमदार कानडे व माजी आमदार कांबळे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असून दोघांनीही आता निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे.

Assembly Election | पालघरात बहुतांश मतदारसंघात तिरंगी लढत होणार

आता आम्ही माघार घेणार नसल्याचेही या दोघांनी जाहीर केले आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याचा प्रश्न येत नसल्याचे सांगितल्याने आता महायुतीतील दोन्ही पक्ष एकमेकासमोर दिसणार आहेत.

कानडेंमागे आदिक; कांबळेंकडे विखेंची ताकद!

आमदार कानडे यांच्या मागे आदीकांची ताकद तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या मागे विखे पाटील यांची ताकद उभी असल्यामुळे हे दोन्ही उमेदवार आता माघारीच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यात काल विखे यांनी कांबळे यांच्या विजयासाठी सभा घेवून त्यांना मोठे पाठबळ दिले आहे.

तसेच आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी बंड पुकारत मनसेचे जिल्हा अध्यक्ष बाबा शिंदे यांनी त्यांना बरोबर घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेवेत प्रवेश करून मनसेचा एबी फॉर्म जोडत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले जितेंद्र तोरणे यांनी जनस्वराज्य या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

2024-10-30T08:10:44Z