नाशिक : विल्होळीकडून सारूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.2) रात्री घडली.
अंकुश ढवळू भोये (27, रा. सारूळ) व पोपट लक्ष्मण वाघ (30, रा. परदेशवाडी, ता. इगतपुरी) यांचा मृत्यू झाला आहे. भोये व वाघ हे दोघे रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास विल्होळीकडून सारूळ गावाच्या दिशेने जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरचालकाने भरधाव वाहन चालवून दुचाकीस धडक दिली. यात दाेघांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
2025-02-04T04:08:03Z