महाराष्ट्र

Trending:


Mumbai Tempreture: मुंबईत उकाड्यापासून दिलासा नाही; सोमवारी ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमानाचा अंदाज

Mumbai Tempreture: सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान असू शकेल. सध्या मुंबईत येणारा प्रचंड उकाड्याचा आणि उष्ण हवेचा अनुभव सोमवारी कायम असेल असाही अंदाज आहे.


Swati Maliwal Latest Marathi News: मुख्यमंत्री निवासस्थानी गेले तेव्हा...; स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन, दिल्लीत खळबळ, नेमकं काय घडलं?

Swati Maliwal Latest Marathi News: आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याबाबत दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


Yogi Adityanath: योगींच्या सभेने वातावरण बदलणार? डॉ. भामरेंच्या प्रचारार्थ आज मालेगावी दौरा

Yogi Adityanath Malegaon Sabha: भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज (दि. १८) मालेगावात जाहीर सभा होत आहे.


भूगोलाचा इतिहास : दंतकथा बनलेला इंजिनीअर

आधुनिक भारताला आकार देणाऱ्या थोर विभूतींपैकी एक भारतरत्न इंजिनीअर डॉ. एम. विश्वेश्वरैया भारतमातेचे केवढे महान सुपुत्र होते हे अभ्यासानंतरच कळते.


पुन्हा मुलींची बाजी!

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईचा निकाल यंदाही उत्साहवर्धक राहिला आहे. या निकालाच्या डेटाचे विश्लेषण करण्याबरोबरच त्याच्या सामाजिक पैलूंचीही चर्चा होणे स्वाभाविक आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रेंडनुसार यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाणही चांगले असले, तरी मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बारावी परीक्षेच्या निकालात एकूण …


Pm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप

मुंबईतल्या महायुती आणि इंडिया आघाडीच्या सभेतून एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली. तर असली नकली शिवसेनेवरुन नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा एकदा वार-प्रतिवार रंगला. तर शरद पवार यांनीही नकली शिवसेनेच्या टीकेवरुन मोदींना टोला लगावलाय. तर उद्धव ठाकरेंनी देखील सडकून टीका केली "बाळासाहेबांची घराणेशाही चालत नाही, पण गद्दाराच्या कार्ट्याला उमेदवारी देता. ज्या प्रमोद महाजनांनी भाजप वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली. पूनम तुमच्या पक्षात असली तरी प्रमोद महाजन आणि माझे भावासारखे संबंध होते", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे आपण जमलो आहेत. दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जमले आहेत. सगळे बेअकली आणि नकली आहेत. 4 जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. कारण 4 जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्याप्रमाणे 4 जून ला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. तुमची मुंबईत पंतप्रधान म्हणून शेवटी सभा आहे.


Raj Thackeray Speech : मोदींसमोर तोफ धडाडली, राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech : येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडका लावण्यात आला. शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची देखील उपस्थित होती. कारण मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पुणे, कोकण, कल्याण-डोंबिवली आणि आता मुंबई अशा महत्त्वाच्या...


Narendra Modi Duplicate Vikas Mahante : शिवाजीपार्कात डुप्लिकेट मोदींची हवा, विकास महंते काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे शिवतिर्थ बंगल्यावर एकत्र दिसून आले. शिवाजी पार्क मैदानासमोर असलेल्या राज ठाकरेंच्या शिवतिर्थ बंगल्यावरील गॅलरीत तिन्ही नेते एकत्र संवाद साधताना पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. राज ठाकरेंच्या गॅलरीत तिन्ही नेते दिसले, तिघेही हास्यविनोद करताना पाहायला मिळाले. शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची भिवंडीत भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे आणि आपचे खासदार संजय सिंह हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी शिवाजी पार्क येथे सभा घेत आहेत. मोदी सभा घेत असल्याचा आम्हाला आनंद असल्याची भावना महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी व्यक्त केलीय. या सभेसाठी भाजपा व मनसे पदाधिकारी मुंबईतील शिवाजी पार्ककडे निघाल्याचे दिसून येते.


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजितदादा दोषी नाहीत

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


Maharashtra News Live : घाटकोपर दुर्घटनाप्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला मुंबईत आणलं

PM Modi Raj Thackeray Rally Live : राज्यातील राजकीय, हवामाना अंदाज, अपघात आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.


Parbhani : गोविंदपूर येेथे महिलेचा विनयभंग

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत …


ABP Majha Headlines : 07.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला. भटकती आत्माच्या टीकेवरुन शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल. ४ जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे, पवार तुरुंगात जाणार, बीकेसीतील सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघआात, मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप... भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक, नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमेठी दौऱ्यावर, स्मृती इराणींसाठी रोड शोमध्ये सहभागी होणार ((अमित शाहांचा आज अमेठीत रोड शो))


Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दल शीघ्र कृती दल तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेला आहे. या मैदानाच्या चारी बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कट आउट देखील लावण्यात आलेले आहेत. आजच्या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागला आहे यासोबतच राज ठाकरे काय भूमिका मांडतायेत हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. मैदानाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी


Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी

Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेबद्दल आणि एकुणच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.


BJP-Shivsena Rada Mulund : भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा! ABP Majha

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला. हे ही वाचा मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसवून ओवैसीसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंच्या 7 बेधडक मागण्या! Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.


Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारवर हल्ला, आधी हार घातला आणि माग कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

Kanhaiya Kumar Video: कन्हैया कुमार हे काँग्रेसच्या तिकीटावर ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. यासाठी ते प्रचार करत आहेत. याच प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर सात ते आठ जणांनी हल्ला करत त्यांच्या कानशिलात लगावली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. कन्हैया कुमार यांनी भारतीय सैन्याविरोधात भाष्य केले होते. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे.


विशाल पाटलांचा संजयकाका पाटलांवर निशाणा

VISHAL PATIL ON SANJAY KAKA PATIL NEWS


Covaxin घेणाऱ्या 30% लोकांमध्ये गंभीर साइड इफेक्ट्स

मुंबई : कोरोना व्हायरसवर भारत बायोटिकद्वारे विकसित केलेल्या कोवॅक्सिन लसीचे गंभीर साईड इफेक्ट्स आता समोर येत आहेत. बीएचयूच्या नव्या अभ्यासात असा दावा करण्यात आलेला आहे की ज्या लोकांनी कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे अशा 30 टक्के लोकांमध्ये त्याचे साईड इफेक्ट्स दिसू लागले आहेत. तर महिलांमध्ये मासिक पाळी संदर्भात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अधिकतर कोवॅक्सिन लस घेतलेल्या रुग्णांना श्वास घेण्यासंदर्भात अडचणी येत आहेत.बीएचयूचे डॉक्टर संखा सुभ्रा...


Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal : नाराजीच्या चर्चेनंतर गिरीश महाजन भुजबळांच्या निवासस्थानी

Girish Mahajan : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमध्ये लोकसभेसाठी इच्छुक होते. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगल्या आहेत. यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) हे तातडीने भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे छगन भुजबळांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. महायुतीत शिवसेना शिंदे गटाला नाशिकची जागा मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे प्रचारात सक्रीयपणे सहभागी होताना दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला भुजबळांनी हजेरी लावली होती. त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर झाली असे दिसत होते. मात्र आज सकाळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे मला समजले, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आले आहे.


Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे ते नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.


RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत आजपासून अर्ज करा; शिक्षण विभागाची माहिती

Right To Education Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने उद्या शुक्रवारी १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.


बारामतीपाठोपाठ शिरूरच्या EVM गोडाऊनमधली CCTV डिस्प्ले 24 तास बंद!

शिरूर, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : बारामती लोकसभेच्या ईव्हीएमवर सुरक्षिततेसाठीच्या सीसीटीव्हीचा डिस्प्ले 45 मिनिटे बंद पडल्याने मोठा वाद उभा राहिला. पण दुसरीकडे शिरूर लोकसभेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या सीसीसीटीव्हीचा डिस्प्ले 24 तास बंद होता. याची उमेदवारांच्या प्रतिनिधींना थोडीसुद्धा कल्पना नव्हती. कारण जागेवर कुणीच नव्हते. सीसीटीव्हीचा डिस्प्ले बंद असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली असून, अधिकार्‍यांच्या ही बाब लक्षात...


SSC/HSC Result 2024 : 10 वी, 12 वी चा निकाल कधी ? बोर्डाकडून महत्त्वाची माहिती

पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी : दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांच्या आयुष्यातील देखील महत्त्वाचा टप्पा असतो. या दोन परीक्षानंतरच सामान्यपणे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरते. दहावी, बारावी परीक्षांच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात लागणार आहे. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्यात...


पावसाची गॅरंटी

Monsoon 2024: ​​साधारण मे महिन्याच्या मध्यावर मान्सूनच्या आगमनाचा एक अंदाज जाहीर होत असतो; तो तसा बुधवारी जाहीर झाला. त्या अंदाजानुसार, केरळमध्ये ३१ मे रोजी मान्सून दाखल होणार आहे. ही तारीख चार दिवस इकडे-तिकडे होऊ शकते.


Arvind Kejriwal speech Bhiwandi : मत नव्हे भीक मागायला आलोय, पवारांसमोर केजरीवालांचं भाषण

Arvind Kejriwal, Bhiwandi Meeting :"विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक केले. काँग्रेस पार्टीचे बँक अकाऊंट फ्रिज केले. शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, असं करुन निवडणूक लढणार आहात? मोदीजी तुम्ही भित्रे आहात", असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भिवंडीत इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी केजरीवालांनी भिवंडीतील सभेलाही हजेरी लावली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार करुन दिले. मात्र, मला शुगर आहे, जेलमध्ये मला 15 दिवस गोळ्या घेऊ दिल्या नाहीत. मला रोज चार वेळेस इंजक्शन लागते. मी तुरुंगात असताना मला इंजक्शन देखील घेऊ देत नव्हते. मला जेलमध्ये टाकून दिल्लीतील लोकांना मोफत मिळणारी वीज बंद करु इच्छित आहेत. पुतीनने विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले किंवा मारुन टाकले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तशीच अवस्था आहे. मोदीजी भारतातही तसंच करु इच्छित आहेत. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीवरुन आलोय. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय. काही दिवसांपूर्वी माझी तुरुंगातून सुटका झाली. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो, त्यांनी माझी सुटका केली. मला वाटत नव्हते, की माझी एवढ्या लवकर सुटका होईल. मी ठरवलंय, 21 दिवस झोपणार नाही. 24 तास संपूर्ण देशात फिरुन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.


छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत …


‘भय’भूती : भयाच्या अनंत मिती!

भयाच्या कितीतरी मिती आहेत. प्रत्येकालाच वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ही भीती नक्की भेटते, अनंत रूपांत. कधी आपली सत्त्वपरीक्षा पाहणारी, तर कधी अंतर्जाणिवांचा कस पाहणारी.


गुरूच्या लाल ठिपक्यासमोरून जाणार्‍या चंद्राची ‘जुनो’ने टिपली छबी

वॉशिंग्टन : गुरू हा आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह. त्याला चंद्रही तितकेच मोठ्या संख्येने आहेत. निव्वळ वायूचा एक विशाल गोळा असलेल्या गुरूला तब्बल 95 चंद्र आहेत. त्यापैकी युरोपा, गॅनिमीडसारखे चार चंद्र खगोलशास्त्रज्ञांच्या नजरेत असतात. आता गुरूचा पाचवा मोठा चंद्र त्याच्यावरील प्रसिद्ध ग्रेट रेड स्पॉटवरून जात असताना जुनो अंतराळयानाच्या कॅमेर्‍यात टिपण्यात आला आहे. हा लाल ठिपका …