हनुमान जयंतीच्या दिवशी श्रीकांत शिंदेंचा VIDEO व्हायरल,कार्यकर्तेही गेले भारावून

अजित मांढरे, प्रतिनिधी

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकींची धामधूम सुरू आहे. यातच आज हनुमान जयंती देशभरात साजरी केली जात आहे. याचं औचित्य साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॅा. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी स्वत: हनुमान चालीसा म्हटली आहे. संसदेत तर त्यांनी नॅान स्टॅाप हनुमान चालीसा न अडखळता न चुकता बोलून दाखवली होती. तर आता श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या स्वत: च्या आवाजात हनुमान चालीसा म्हटली असून ती चांगलीच व्हायरल होत आहे.

आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा पठण केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला खुद्द श्रीकांत शिंदे यांनी आपला आवाज दिला आहे. शिवसैनिकांसह तमाम हनुमान भक्तांना हनुमान जयंती निमित्त ही एक अनोखी भेट असल्याचे बोलले जात आहे. कारण लोकप्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे हे ज्ञात आहेतच पण त्यांचे एक वेगळे रुप हनुमान जयंती निमित्त पहायला मिळालं.

'आज श्री हनुमान जन्मोत्सव. श्री हनुमान हे शक्ती, प्रेरणा, सात्विकता आणि भक्तिचं प्रतिक. हीच शक्ती, भक्ती आणि प्रेरणा देणारी हनुमान चालीसा आपण आवर्जून म्हणतो, ऐकतो. आज माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेली हनुमान चालीसा प्रसारित झाली आहे. माझ्यासाठी हा एक वेगळाच अनुभव देणारा क्षण आहे. घरात देव्हाऱ्यात देवासमोर, मंदिरात सर्वांसमोर म्हटलेली हनुमान चालीसा आज या माध्यमातून प्रसारित होणे, हे मी भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली.

आज श्री हनुमान जन्मोत्सवच्या शुभ प्रसंगी माझ्या आवाजातील श्री हनुमान चालीसा श्री हनुमानाच्या चरणी अर्पण करतो. माझा हा प्रयत्न आपण स्वीकारावा, हनुमानाची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो, असं म्हणत शिंदेंनी शुभेच्छाही दिला.

2024-04-23T09:22:47Z dg43tfdfdgfd